Home / कुठेतरी छानसे वाचलेले / श्री गणेश - Shree Ganesh / १४ विद्या आणि ६४ कलां १४ विद्या आणि ६४ कलां कुठेतरी छानसे वाचलेले, श्री गणेश - Shree Ganesh  १४ विद्या आणि ६४ कलां प्राचिन कालापासुन आपल्याकडे १४ विद्या आणि ६४ कलां चौदा विद्या चार वेद + सहा वेदांगे + न्याय, मीमांसा, पुराणे व धर्मशास्त्र अश्या एकूण चौदावेद : १. ऋग्वेद २. यजुर्वेद ३. सामवेद ४. अथर्ववेद सहा वेदांगे १. व्याकरण- भाषेतील शब्दांच्या व्यवहाराचे शास्त्र. २. ज्योतिष- ग्रहगती तथा सामुद्रिक जाणण्याची विद्या. ३. निरुक्त- वेदांतील कठीण शब्दांचे अर्थ सांगणारे शास्त्र. ४. कल्प- धार्मिक विधी- व्रतांचे वर्णन करणारे शास्त्र. ५. छंद- शब्दांची गानयोग्य रचना व काव्यवृत्ताचे ज्ञान. ६. शिक्षा- शिक्षण, अध्यापन व अध्ययन.७.१. न्याय,७.२. मीमांसा, ७.३. पुराणे ७.४. धर्मशास्त्र. चौसष्ट कला १. पानक रस तथा रागासव योजना - मदिरा व पेय तयार करणे. २. धातुवद- कच्ची धातू पक्की व मिश्रधातू वेगळी करणे. ३. दुर्वाच योग- कठीण शब्दांचा अर्थ लावणे. ४. आकर ज्ञान - खाणींविषयी अंतर्गत सखोल ज्ञान असणे. ५. वृक्षायुर्वेद योग- उपवन, कुंज, वाटिका, उद्यान बनविणे. ६. पट्टिका वेत्रवाणकल्प- नवार, सुंभ, वेत इत्यादींनी खाट विणणे. ७. वैनायिकी विद्याज्ञान- शिष्टाचार व विनय यांचे ज्ञान असणे. ८. व्यायामिकी विद्याज्ञान- व्यायामाचे शास्त्रोक्त ज्ञान असणे. ९. वैजापिकी विद्याज्ञान- दुसऱ्यावर विजय मिळविणे. १०. शुकसारिका प्रलापन- पक्ष्यांची बोली जाणणे. ११. अभिधान कोष छंदोज्ञान- शब्द व छंद यांचे ज्ञान असणे. १२. वास्तुविद्या- महाल, भवन, राजवाडे, सदन बांधणे. १३. बालक्रीडाकर्म- लहान मुलांचे मनोरंजन करणे. १४. चित्रशब्दापूपभक्षविपाक क्रिया- पाकक्रिया, स्वयंपाक करणे. १५. पुस्तकवाचन- काव्यगद्यादी पुस्तके व ग्रंथ वाचणे. १६. आकर्षण क्रीडा- दुसऱ्याला आकर्षित करणे. १७. कौचुमार योग- कुरुप व्यक्तीला लावण्यसंपन्न बनविणे. १८. हस्तलाघव- हस्तकौशल्य तथा हातांनी कलेची कामे करणे. १९. प्रहेलिका - कोटी, उखाणे वा काव्यातून प्रश्न विचारणे. २०. प्रतिमाला - अंत्याक्षराची योग्यता ठेवणे. २१. काव्यसमस्यापूर्ती - अर्धे काव्य पूर्ण करणे. २२. भाषाज्ञान - देशी-विदेशी बोलींचे ज्ञान असणे. २३. चित्रयोग - चित्रे काढून रंगविणे. २४. कायाकल्प - वृद्ध व्यक्तीला तरुण करणे. २५. माल्यग्रंथ विकल्प - वस्त्रप्रावरणांची योग्य निवड करणे. २६. गंधयुक्ती - सुवासिक गंध वा लेप यांची निर्मिती करणे. २७. यंत्रमातृका - विविध यंत्रांची निर्मिती करणे. २८. अत्तर विकल्प - फुलांपासून अर्क वा अत्तर बनविणे. २९. संपाठय़ - दुसऱ्याचे बोलणे ऐकून जसेच्या तसे म्हणणे. ३०. धारण मातृका - स्मरणशक्ती वृद्धिंगत करणे. ३१. छलीक योग- चलाखी करून हातोहात फसविणे. ३२. वस्त्रगोपन- फाटकी वस्त्रे शिवणे. ३३. मणिभूमिका - भूमीवर मण्यांची रचना करणे. ३४. द्यूतक्रीडा - जुगार खेळणे. ३५. पुष्पशकटिका निमित्त ज्ञान - प्राकृतिक लक्षणाद्वारे भविष्य सांगणे. ३६. माल्यग्रथन - वेण्या, पुष्पमाला, हार, गजरे बनविणे. ३७. मणिरागज्ञान - रंगावरून रत्नांची पारख करणे वा ओळखणे. ३८. मेषकुक्कुटलावक - युद्धविधी- बोकड, कोंबडा इ.च्या झुंजी लावणे. ३९. विशेषकच्छेद ज्ञान - कपाळावर लावायच्या तिलकांचे साचे करणे. ४०. क्रिया विकल्प - वस्तूच्या क्रियेचा प्रभाव उलटविणे. ४१. मानसी काव्यक्रिया - शीघ्र कवित्व करणे. ४२. आभूषण भोजन - सोन्या-चांदी वा रत्नामोत्यांनी काया सजवणे. ४३. केशशेखर पीड ज्ञान - मुकुट बनविणे व केसात फुले माळणे. ४४. नृत्यज्ञान - नाचाविषयीचे शास्त्रोक्त सखोल ज्ञान असणे. ४५. गीतज्ञान - गायनाचे शास्त्रीय सखोल ज्ञान असणे. ४६. तंडुल कुसुमावली विकार - तांदूळ व फुलांची रांगोळी काढणे. ४७. केशमार्जन कौशल्य - मस्तकाला तेलाने मालीश करणे. ४८. उत्सादन क्रिया - अंगाला तेलाने मर्दन करणे. ४९. कर्णपत्र भंग - पानाफुलांपासून कर्णफुले बनविणे. ५०. नेपथ्य योग - ऋतुकालानुसार वस्त्रालंकाराची निवड करणे. ५१. उदकघात - जलविहार करणे. रंगीत पाण्याच्या पिचकारी करणे. ५२. उदकवाद्य - जलतरंग वाजविणे. ५३. शयनरचना - मंचक, शय्या व मंदिर सजविणे. ५४. चित्रकला - नक्षी वेलवुट्टी व चित्रे काढणे. ५५. पुष्पास्तरण - फुलांची कलात्मक शय्या करणे. ५६. नाटय़अख्यायिका दर्शन - नाटकांत अभिनय करणे. ५७. दशनवसनांगरात - दात, वस्त्रे, काया रंगविणे वा सजविणे. ५८. तुर्ककर्म - चरखा व टकळीने सूत काढणे. ५९. इंद्रजाल - गारुडविद्या व जादूटोणा यांचे ज्ञान असणे. ६०. तक्षणकर्म - लाकडावर कोरीव काम करणे. ६१. अक्षर मुष्टिका कथन - करपल्लवीद्वारे संभाषण करणे. ६२. सूत्र तथा सूचीकर्म - वस्त्राला रफू करणे. ६३. म्लेंछीतकला विकल्प - परकीय भाषा ठाऊक असणे. ६४. रत्नरौप्य परीक्षा - अमूल्य धातू व रत्ने यांची पारख करणे. SHARE THIS Facebook FILM - CINEMA मराठी तारकांनी साजरा केला गणेश उत्सव २०१५ Celebrity Ganesh Festival अष्टविनायक (ASHTAVINAYAK) अष्टविनायक (Ashtavinayak) दर्शन - आठवा गणपती- श्री बल्लाळेश्वर (श्रीक्षेत्र पाली,रायगड) अष्टविनायक (ASHTAVINAYAK) अष्टविनायक (Ashtavinayak) दर्शन सातवा गणपती- श्री वरदविनायक (श्रीक्षेत्र महड,जि.रायगड) Loading... POPULAR POSTS  टकाटक २५ मराठी विनोद Marathi Jokes - जोक्स खळखळून हसवणारे  धडाकेबाज २५ मराठी विनोद Marathi Jokes - जोक्स - मस्तीचा तडका  चावट चम्या आणि चिवट चिंगी चे २५ मराठी विनोद Marathi Jokes - जोक्स - मस्तीचा तडका बघा कसा आहे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील पाऊस ! Mr. NosyPostAug 21, 2017 फेकिंग न्यूज - सोनू तुझा माझ्यावर भरवसा नाही काय ? गाणाच्या चाहत्यांसाठी नवीन वार्ड सुरू करा - मागणी KRIM SoftAug 19, 2017 हिम्मत असेल तरच वाचा !! Mr. NosyPostAug 18, 2017 बाळूचा झक्कास इंटरव्हू - हसून वेडे व्हाल नक्की ! Boneless ResearchAug 17, 2017 recentcomments FOLLOW BY EMAIL  Email address... SUBMIT TAGS 3 million CID Jokes Cricket faltupana.in Film - Cinema Marathi Video WhatsApp अष्टविनायक (Ashtavinayak) ऐतिहासिक कथाकथन काहीतरी मजेशीर कुठेतरी छानसे वाचलेले कुसुमाग्रज क्रीडा - Sport दिनविशेष धमाकेदार किस्सा पर्यटन पुणेरी पाटी - पुणेरी पाट्या (Puneri Pati - Puneri Patya) फेकिंग न्यूज बातम्या - News मराठी कविता मराठी ग्राफिटी - Marathi Graffiti मराठी नाटक मराठी मुलगी मराठी विनोद Jokes रिकामटेकडेपणा विनोदी चित्र - Funny Images श्री गणेश - Shree Ganesh FEATURED POSTS बघा कसा आहे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील पाऊस ! Mr. NosyPostAug 21, 2017 फेकिंग न्यूज - सोनू तुझा माझ्यावर भरवसा नाही काय ? गाणाच्या चाहत्यांसाठी नवीन वार्ड सुरू करा - मागणी KRIM SoftAug 19, 2017 हिम्मत असेल तरच वाचा !! Mr. NosyPostAug 18, 2017 बाळूचा झक्कास इंटरव्हू - हसून वेडे व्हाल नक्की ! Boneless ResearchAug 17, 2017 RECENT POSTS ABOUT ME faltupana.in ही 2011 पासून सोशल मीडियावर लोकांचे मनोरंजन करणारी तुम्हा सर्वांची लाडकी वेबसाईट आहे, तुमच्या प्रेमाचे फळ आहे की आज पर्यन्त 60 लाख हून अधिक लोकांनी ह्या वेबसाईट ला भेट दिली आहे .. असेच प्रेम बरसू द्या .. Learn More → Entertain By faltupana.in | Supported By KRIM Soft
No comments:
Post a Comment